Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली शहर तहानलेले

*पाण्यासाठी महिलांची भटकंटी*
“सावली शहरातील प्रभाग क्र.२मध्ये पाण्याची बिकट समस्या”

*सावली(बाबा मेश्राम)*-सावली मध्ये ग्रामपंचायत असताना साधी नळ योजना,नंतर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतंर्गत फिल्टर नळ योजना सुरू करण्यात आली,त्यानंतर नगरपंचायत रुपांतरण झाल्यानंतर वाढती लोकसंख्या व पाणी समस्या लक्षात घेता जलशुध्दीकरण केंद्रातर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली,व नवीन जलवाहीनी टाकण्यात आली ,असे असतानाही शहरातील प्रभाग क्र २ मध्ये पाण्यासाठी महिलांना भटकंटी करावी लागत आहे, नेहमीच सावली शहरातील प्रभागामध्ये पाणी समस्या उद्भवत असते, त्यामुळे महिलांनी कामे सोडुन इकडे तिकडे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची दिसुन येत आहे,
शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची समस्या लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री यांनी १२.५०कोटीची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत केली, या योजनेद्वारे प्रत्येक प्रभागात नवीन जलवाहीनी टाकल्या गेली,व.नवीन नळ कनेक्शन सुध्दा देण्यात येत आहे , त्यासाठी ज्याच्या कडे पुर्वीपासूनच नळ नाही अशांना १५०० रुपये अनामत भरून तर ज्यांच्या कडे नळ आहेत अशांना मालमत्ता व पाणी पट्टी कराचा भरणा करून नळ.कनेक्शन कनेक्शन दिल्या जात आहे , प्रभागातील जनता वरील अटी,शर्ती ची पुर्तता करून नळ कनेक्शन घेत असताना हि पाण्याची समस्या बिकट दिसत आहे ,नवीन कनेक्शन धारकांना सुध्दा पाणी बरोबर मिळत नसल्याची चर्चा प्रभागात सुरू आहे,
जल शुध्दीकरण केंद्रांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे नवीन जलवाहिनी टाकण्यात आली ,तसेच या द्वारे साधे नळ व फिल्टर नळ.कालांतराने बंद करून फक्त वाढीव योजनेद्वारेच नळ कनेक्शन धारकांना पाणी दिले जाणार आहे ,असे असले तरी साधे व फिल्टर सुध्दा बंद.आहेत तर नवीन नळ.कनेक्शन व.प्रभागातील स्टांड पोस्ट असलेल्या नळांनाही पुरेसे पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे,सावली शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक वेळा जलवाहिनी फुटत गेली, तसेच बरोबर टि पाईंट माहिती नसल्याने तिथेच पाणी समस्या निर्माण होत असल्याचे बोलले जाते, याकडे संबंधित कंत्राटदाराचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे, अनेक वेळा एकाच ठिकाणी जलवाहिनी फुटली जाते आणि पुन्हा तिथेच खोदाई करुन पाईप जोडले जातात,दोन तीन वर्षापासून पाण्याची समस्या असतानाही प्रभागातील नगरसेवक,नगराध्यक्ष तसेच नगरपंचायत दुर्लक्ष होत आहे, मागील २-३वर्षात नळ बंद होते तरीही त्याचे कर भरून कनेक्शन घ्या ,या गंभीर बाबींकडे प्रशासनाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावी अशी एकमुखी मागणी प्रभागातील जनता करीत आहे।.।

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!