Vidarbh24News

Latest Online Breaking News

*रोहितभाऊ बोम्मावार यांच्या पाठपुराव्याला यश; अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत खेडी मायनरच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

सावली: खेडी परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नासंदर्भात *मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार* यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आज खेडी मायनरच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी मा. रोहितभाऊ बोम्मावार यांच्या नेतृत्वात शेतकरी व ग्रामस्थांनी खेडी मायनरची पाहणी करून उपविभागीय अभियंता श्री. हरिराम येनस्कर यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवली होती. यावेळी कालव्याची झालेली दुरवस्था, सिंचनातील अडचणी व आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या.

या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली व खेडी मायनरच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हक्काचे पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनाचे तसेच मा. रोहितभाऊ बोम्मावार यांचे आभार मानत, काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

“शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठीचा हा लढा असून, काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील,” असे मा. रोहितभाऊ बोम्मावार यांनी यावेळी सांगितले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!