Vidarbh24News

Latest Online Breaking News

*बुध्द पौर्णिमा (वैशाखी पौर्णिमा)- शांती , अहिंसा व समतेचे प्रतीक*

*प्रासंगिक*.
आज बुध्द पौर्णिमा (वैशाखी पौर्णिमा), जगाला शांती, अहिंसा, समता व करुणेचा संदेश देणा-या महामानव तथागत गौतम बुद्धांचा जन्म याच दिवशी झाला. तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावादीची शिकवण दिली. आज बुध्द पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन….

बुध्द पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी गौतम बुध्दांचा जन्म , ज्ञानप्राप्ती (बुद्धत्व) आणि महापरीनिर्वाण असे तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्याने याला त्रिविध पावन पौर्णिमा असे म्हणतात, सिध्दार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी (नेपाळ) येथे झाला, ज्ञानप्राप्ती-गया (बिहार) येथे बोधिवृक्षाचा खाली बुद्धत्व प्राप्त झाले. तर महापरीनिर्वाण -वयाच्या ८० वर्षी त्यांनी कुशीनगर येथे देहत्याग केला..

*गौतम बुद्धांची शिकवण*
*चार आर्यसत्य*- दु:ख, दु:खाचे कारण ,दु:ख निवारण आणि दु:ख निवारण्याचा मार्ग…

*अष्टांगिक मार्ग*-सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजाविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी..

*पंचशिल तत्वे*. अहिंसा, चोरी न करणे, सत्य बोलणे, मादक पदार्थांपासून दुर राहणे, सदाचार.
तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली हि शिकवण मानवी विकासासाठी आहे,”अत्त दिप भव” त्यांनी स्वयं प्रकाशित व्हा असे म्हटले, स्वतःचा उद्धार स्वतः करा..
‘बुध्द शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघ शरणं गच्छामी, असे बुध्दाला वंदन करतात , दानधर्म, उपवास व धान्यसाधना याला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे
प्रेम,करुणा व शांतीचा संदेश देणारी ही बुद्ध पौर्णिमा देशभर मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो,
विशेष म्हणजे आज १ मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे, आणि याच दिवशी बुध्द पौर्णिमा असा हा संगम आहे, सर्व वाचकांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…

*बाबा मेश्राम, उपसंपादक, विदर्भ २४ न्युज, सावली*—

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!