Vidarbh24News

Latest Online Breaking News

*त्रिकाय गेडाम यांची नवोदय व सैनिकी विद्यालयात दुहेरी निवड*

सावली: सावली येथील अरहतो एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित राणी यशोधरा इंग्लिश मिडीयम स्कूल, सावली येथील विद्यार्थी त्रिकाय प्रमोद गेडाम यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत दुहेरी मान मिळवला आहे.

सत्र २०२५-२०२६ दरम्यान नवोदय विद्यालय समितीद्वारे दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षेत त्रिकाय गेडाम यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले. या यशासोबतच त्यांची नुकतीच शासकीय सैनिकी विद्यालयातही निवड झाली असून, त्यांच्या या दुहेरी यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशामागे शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः तुषार बोरकर सर, रायपुरे सर, पौर्णिमा गेडाम मॅडम, वाळके मॅडम व दुर्गे सर यांनी विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन केले.

त्रिकायचे वडील प्रमोद गेडाम हे मजुरीचे काम करतात तर आई विशाखा गेडाम गृहिणी आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी त्रिकाय गेडाम यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!