Vidarbh24News

Latest Online Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतेचा महायज्ञ; ७१ रक्तदात्यांचे स्वेच्छा रक्तदान

सावली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावली तालुक्यात भाजप शहर, ग्रामीण, महिला, युवा मोर्चा तसेच सर्व आघाड्यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वामनराव गड्डमवार सांस्कृतिक भवन, बाजार समिती सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ७१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

रक्ताच्या एका पिशवीमुळे तीन रुग्णांना नवजीवन मिळू शकते, या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “एक हात मदतीचा” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत अनेकांनी रक्तदान केले.

अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, थॅलेसेमिया, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या उपक्रमातून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा सामाजिक संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप सावली तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, महामंत्री सतीश बोम्मावार, कोषाध्यक्ष जीतू धात्रक, नितीन कारडे, अविनाश पाल, भोगेश्वर मोहर्ले, नीलम सुरमवार, छाया चकबंडलवार, पूनम झाडे, जीतू सोनटक्के, विशाल करांडे, कवींद्र रोहनकर, सचिन तगडपल्लीवार, देवराव मुदमवार, प्रकाश गड्डमवार, मयूर गुरनुले, आशीष संतोषवार, प्रदीप कुकुडकार तसेच भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!