Vidarbh24News

Latest Online Breaking News

*शेत पिकांसाठी आसोलामेंढा तलावाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे*

“मा.खास. डॉ अशोक नेते यांची मागणी”

 

*सावली* पावसाळी हंगामातील दोन महिन्यांचा कालावधी लोटत आहे,यात पावसाचे चार नक्षत्र लोटुन गेले, शेवटी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्यांची आशा जागृत ठेवली ,या कालावधीत अनेकांनी आपल्या शेतात आवत्या टाकले तर कोणी धानरोवणीसाठी प-हे भरले, मात्र पुन्हा पावसाने धोका दिल्याने पिके वाचविण्यासाठी तालुक्यातील गोसे अंतर्गत आसोलामेंढा तलावाचे पाणी शेतीसाठी त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी डॉ अशोक नेते (मा.खास.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजप अनुसुचित जनजाती मोर्चा) यांनी केली आहे..

सावली तालुक्यातील हजारो हेक्टर शेती हि असोलामेंढा तलावाच्या पाण्यावर अवलंबून असते,या तलावात काही वर्षांपासुन गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जात आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी याचा मोठा फायदा होतो, परंतु या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीलाच पावसाने प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात आहे, तरीही बळीराजाने न घाबरता आपल्या शेतात बियाण्याची पेरणी केली आहे, परंतु पावसा अभावी आवत्या , धान प-हे सुकलेले दिसत आहे,तर शेत जमीन कोरडी पडत आहे, तसेच दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे,महागडे बि बियाणे, रासायनिक खते,वाढती मजुरी यामुळे बळीराजा हतबल झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लवकरात लवकर आसोलामेंढा तलावाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे, ,अशी मागणी डॉ अशोक नेते यांनी केली आहे….

  *बॉक्स*:- डॉ अशोक नेते यांनी गोसे अंतर्गत आसोलामेंढा नुतनीकरण प्रकल्प येथील उपविभागीय अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे साधून पाण्या संदर्भात शेतकऱ्यांशी समस्या मांडली आणि शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली तर यावेळी गोसेचे अधिकारी यांनी त्वरित पाणी सोडण्याची ग्वाही दिली…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!