Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावली नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सोनी खोब्रागडे यांची बिनविरोध निवड*

*सावली* नगरपंचायत सावलीच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सोनी आकाश खोब्रागडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रभाग क्रमांक १६ अनुसूचित जाती या प्रवर्गातुन २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सौ.लता लाकडे या विजयी झाल्या होत्या, त्यानंतर त्यांना नगराध्यक्ष पदाचा सुध्दा बहुमान मिळाला होता, परंतु त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे सदर प्रभागातील नगरसेवकाचे पद रिक्त होते.

शासन व निवडणूक आयोगाला नियमानुसार प्रभाग क्रमांक १६ मध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला,या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सोनी आकाश खोब्रागडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड करण्यात आली , त्यांना विजयी प्रमाणपत्र देऊन नगरपंचायतीच्या सभागृहात त्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सावली तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष नितीन गोहणे,शहर अध्यक्ष क्रिष्णा राऊत,नगराध्यक्षा सौ साधना वाढ ई, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती प्रितम गेडाम, नगरसेवक सचिन संगिडवार, सामाजिक कार्यकर्ते आकाश खोब्रागडे, आणि नगरपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!