सहयोग मल्टीस्टेटच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप
सावली : शिक्षणाला प्रोत्साहन देत गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या उद्देशाने सहयोग उड्डाण फाउंडेशन आणि सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., शाखा सावली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ जुलै २०२६ रोजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा, सावली, जि. प. प्राथमिक शाळा, व्याहाड बुज आणि जि. प. प्राथमिक शाळा, अंतरगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा सावलीचे व्यवस्थापक श्री. अभिलाष येनगंटीवार, सहायक शाखा व्यवस्थापक श्री. अभिनय नवले तसेच शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान देण्याचा हा प्रयत्न भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सहयोग उड्डाण फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवा या क्षेत्रात सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून समाजातील गरजू घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल रामटेके मॅडम, सहयोग उड्डाण फाउंडेशन, संबंधित शाळांचे शिक्षकवृंद तसेच सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., सावली शाखेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले.



