Vidarbh24News

Latest Online Breaking News

एकोरी माता, देवटोक देवस्थानाला तिर्थक्षेत्र वर्ग क दर्जा

एकोरी माता, देवटोक देवस्थानाला तिर्थक्षेत्र वर्ग क दर्जा
सावली तालुक्यांतील व्याहाड बुज येथील एकोरी माता मंदिराला आणि साखरी ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या देवटोक मुरकुंडेश्वर देवस्थानाला तिर्थक्षेत्र वर्ग क चा दर्जा मिळाला आहे
व्याहाड बूज येथील एकोरी माता मंदिर पुरातन काळापासून आहे. येथे अनेक वर्षापासून नवरात्रीला यात्रा भरते दूरदुरून भाविक दर्शनाला येत असतात. व्याहाड बूज येथील टेकडीवर एकोरी माता मंदिरात राम लक्ष्मण, हनुमान अश्या अनेक देवीदेवतांच्या मुर्त्या आहेत. अनेक भक्तगण दर्शनासाठी येत असतात.

साखरी ग्रामपंचायतीतील देवटोक मुरकुंडेश्वर देवस्थान मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. लॉकडाऊन काळात या ठिकाणीं खोदकाम केले असता. शिवलिंग आढळले होतें त्यावेळी दूरवरून भाविक दर्शनसाठी येत होते.
या दोन्ही देवस्थानाला तिर्थक्षेत्र वर्ग क चा दर्जा मिळावा यासाठी गडचिरोली – चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, माजी उपसभापती रविंद्र बोलीवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे सुधिरभाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री यांनी दखल घेऊन तिर्थक्षेत्र वर्ग क मंजुरी दिली आहे. तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून विशेष फंड मिळणार आहे. लाखो रुपयांचे दरवर्षी अनुदान मिळणारं आहे.त्यामूळे या क्षेत्राचा विकास होण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यामूळे परिसरातील भाविकात आनंदाचे वातावरण आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!