Vidarbh24News

Latest Online Breaking News

श्री. गुरुदेव सेवा मंडळ खांडला सरांडी तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन साजरी…

श्री. गुरुदेव सेवा मंडळ खांडला सरांडी तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन साजरी…

ग्रामगीता तत्वज्ञानाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तिथीनुसार ५२ व्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गुरुदेव सेवा मंडळ खांडला सरांडी तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर यांच्यावतीने  कार्यक्रम साजरा करण्यात आला. मंडळाच्या वतीने “मोझरी “जिल्हा अमरावती येथे दरवर्षी पालखी नेण्यात येत होते. परंतु यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे तो कार्यक्रम गावामध्येच साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेऊन व मास्क बांधून मंडळाच्या सदस्यांनी मौन व श्रद्धांजली अर्पण केली.                                                          सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी  प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रमदानाने गावातील साफ सफाई करण्यात आली.नंतर भजन, गाण्यांनी राष्ट्रसंतांची पालखी गावातून फिरवण्यात आली. त्यांनतर आश्रम सेवक नत्तु मेश्राम यांनी ग्रामगीता वाचन व मोलाचे मार्गदर्शन केले.                                              यावेळी आश्रम सेवक :- नत्तु मेश्राम , पोलिस पाटिल:- सुरेंद्र मेश्राम , कृष्णा आनंदे , आकाश कुंभरे तसेच गावातिल युवागनवर्ग , बालगोपाल ,प्रतिष्ठित नागरिक ,तथा खांडला सरांडी येथील आश्रम सेवक मंडळी उपस्थित होती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!