Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पतीला जीवदान देणाऱ्या पत्नीचा मोची समाजाच्या वतीने सत्कार*

*पतीला जीवदान देणाऱ्या पत्नीचा मोची समाजाच्या वतीने सत्कार*

आधुनिक काळातील सावित्री

सोलापूर – मोची समाजाचे सामाजिक कार्यकर्ता व रेल्वे अधिकारी अरुण कांबळे गेल्या सहा महिन्यापासून दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे सतत आजारी पडत होते.

डॉक्टरांनी त्यांना तुमची दोनी किडनी निकामी झाले आहेत तुम्ही दुसरी किडनी बसवावी लागेल असे सांगितले किडनी बदली केल्यास तुम्ही जगणार असे सांगितले त्यांनी किडनी मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न केले पण त्यांना कुठूनही किडनी मिळाली नाही हे सर्व पाहून त्यांच्या धर्मपत्नी सौ प्रणोती कांबळे यांनी धाडस दाखवून पतीला स्वतःची किडनी देण्याची धाडसी निर्णय घेतला व पत्नीने पतीला किडनी देऊन पतीचे प्राण वाचविले अशा धाडसी महिलेचा जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ शहर जिल्हा सोलापूर च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली कांबळे पती पत्नी दाम्पत्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन फेटा शाल साडी श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार केला

यावेळी देवेंद्र भंडारे म्हणाले खरंच अरुण कांबळे भाग्यवान आहेत पतीला मृत्यूचा दाढेतून सोडूविण्याचा धाडसी काम केली आहे आपल्या पतीला स्वतःची किडनी देऊन जीवदान दिले आहे समाजात अशी ही महिला आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे आमच्या मोची समाजाच्या भगिनी मोठे धाडस करू शकतात ज्याप्रमाणे सत्यवानाला सावित्रीने मृत्यूचा दाढेतून सोडवण्याचा काम केले होते आजचा युगातही सावित्री आहे अशा प्रणोतीताईचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशा भगणीला माझा सलाम असे मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी माजी महापौर संजय हेमगड्डी प्रा.ज्योतीताई वाघमारे माजी समाज अध्यक्ष बसवराज म्हेत्रे जनरल सेक्रेटरी सिद्राम कामाटी हणमंतु जंगम नागनाथ कासलोलकर राजु अलकोड हणमंतु सायबोळु दिनेश म्हेत्रे बाबु विटे विठ्ठल मेट्रो रमेश फुले मारुती माळगे मारुती जंगम शंकर म्यगेरी मोहन डागें श्रीमती सुशिला कांबळे अंबादास मोतेकर कुर्ष्णा मुकारे आरुण येवलेकर प्रकाश सातलोलु अंबादास नाटेकर आदी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!