जैरामपुर गावातील विजेचा प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील जैरामपुर या गावच विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत जैरामपूर हे गाव शेतीवर अवलंबून आहे ,सध्या शेतकऱ्यांच्या शेतात भात पिकाची रोवणी चालू आहे आणि लाईन मात्र वारंवार येजा करत असते काही शेततकर्यांचे रोवणे अजूनही होणे बाकी आहे लाईट च्या अभावामुळे पाण्याची सोय होत नाही
जैरामपूर व परिसरातील वीज ही दिवसातून 10 ते 20 वेळा ये जा करत असते यामुळे जैरामपूर येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
विद्युत प्रवाह खंडित न होण्यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे



