Vidarbh24News

Latest Online Breaking News

हॉस्पिटलचं अवाजवी बिल ऐकून कोरोना रुग्ण पळाला

हॉस्पिटलचं अवाजवी बिल ऐकून कोरोना रुग्ण पळाला

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात मुंबईच्या विरारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेत असलेला रुग्ण दीड लाखांचं बिल ऐकून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ रुग्णालयात 12 जुलै रोजी कोरोनावर उपचार घेण्यासाठी विरार परिसरात राहणाऱ्या एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पाच-सहा दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली होती. या उपचाराचं बिल दीड लाखाच्या आसपास असल्याचं रुग्णाला समजताच या रुग्णाने हॉस्पिटलच्या एचआरसोबत बोलण्याचा बहाणा करून रुग्णालयातून पळ काढला. डॉक्टरांनी फोन केल्यावर मी सर्वाना बाधित करण्याची धमकी देण्यात आली आहे. रुग्णालयं अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला होता. नाशिक शहरातील वोकहार्ट हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये 12 जुलैला रमेश करपे या रुग्णाला कोरोनाची लागण झाली म्हणून दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या रुग्णालयाने अवघ्या 10 दिवसात या रुग्णाला तब्बल 3 लाख रुपयांच बिल आकारलं. विशेष म्हणजे हा रुग्ण 10 दिवस केवळ जनरल वॉर्डमध्ये अॅडमिट होता. या 10 दिवासात या रुग्णाला ना ICU ना व्हेंटिलेटर लावण्यात आलं. मात्र, तरीदेखील या हॉस्पिटनं हे अवाजवी बिल आकारलं गेलं.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!