Vidarbh24News

Latest Online Breaking News

*”हर घर संविधान” उपक्रमातंर्गत नाव दाम्पत्यांना एक अनोखी भेट*

सावली : डी. एस. आर लॉन गडचिरोली, येथे दि ३१/०५/२०५ ला, देवताळे-चन्नावार कुटुंबांच्या वतीने पार पडलेल्या विवाह उपरांत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते दरम्यान समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “हर घर संविधान” या अभियानांतर्गत एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत नवविवाहित दाम्पत्याला भारतीय संविधानाचा ग्रंथ भेट स्वरूपात प्रदान करण्यात आला. लोकशाही मूल्यांचे संवर्धन, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्यांची जाणीव आणि संविधानाविषयी जागृती निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे, संविधानाचा ग्रंथ हा फक्त एक दस्तावेज नसून, तो सामाजिक समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे मूळ अधिष्ठान आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संघटनेच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. विवाहासारख्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्यावर नवदांपत्याच्या हातात संविधान देण्याची ही सामाजिक जाणीव निश्चितच अनुकरणीय असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा “हर घर संविधान” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर विविध स्तरांवर राबविण्यात येत असून, समाज परिवर्तनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

सादर कार्यक्रमात नव-विवाहित जोडपे हर्ष – शारदा, वधू पिता सुरेश देवताळे, वर पिता यादव चन्नावार पाहुणे मंडळी, तसेच समता संघर्ष समाज परीवर्तन संघटनेचे पदधिकारी लक्ष्मण मोहुर्ले, किशोर नरूले, राकेश पौरकर, संदीप येनगंटीवार, कालिदास लाटेलवार, नंदेश्वर कथले, क्रिष्ना लाटेलवार, तसेच आप्तेष्ट आणि वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!