Vidarbh24News

Latest Online Breaking News

नमो शेतकरी योजना

मे महिन्यात शेतकऱ्यांना २०००/- ऐवजी ४०००/- मिळणार

नैसर्गिकआपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. ती योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान). शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला सुरुवातीला नागरिकांनी महत्त्व दिलेले नाही; पण काळाच्या ओघात ही योजना लोकप्रिय झाली.
पीएम किसान सन्मान निधी योजनेची लोकप्रियता पाहून राज्य सरकारने नुकत्याच मंजूर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून अशीच योजना राबविण्याची घोषणा केली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या नव्या योजनेचे नाव आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रु. आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000. 12,000 प्रतिवर्ष. मिळेल

योजना सुरू झाल्यापासून ही योजना केवळ नावापुरतीच आहे, या योजनेचा हप्ता मिळणार नाही किंवा योजना राबविली जाणार नाही, अशी चर्चा अनेक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे; मात्र लवकरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
हफ्ता केव्हा जमा होणार ?
केंद्रीय योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

हफ्ता घेण्यासाठी मला नोंदणी करावी लागेल का?
यासंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही; परंतु जे पात्र शेतकरी आधीच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जीआर (शासकीय निर्णय) आला आहे का?
आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधीचा कोणताही अधिकृत जीआर (शासकीय निर्णय) सरकारने जारी केलेला नाही. या योजनेची तपशीलवार माहिती जसे की अर्ज प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, पात्र लाभार्थी यांची सरकारकडून लवकरच घोषणा केली जाईल.

नमो शेतकरी योजनेच्या अटी काय असतील?
साधारणपणे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या अटी व शर्ती सारख्याच आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!