Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विमलताई महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन*

सावली: शिक्षक बहुउद्देशीय शिक्षण मंडळ वाडी , नागपूर द्वारा संचालित,व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित
विमलताई महिला महाविद्यालय सावलीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत भारपायली येथे करण्यात आले.

संस्थेचे सचिव अशोक कुमार घरडे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य इम्रान खान पठाण होते,तर पाहुणे म्हणून दिपक फुलझेले, प्राचार्य डॉ चंद्रमौली(रा.म.गा.म) ,गट विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार, डॉ . सुरेश राठोड, गट शिक्षणाधिकारी वैभव खांडरे सरपंच ज्योती बहिरवार , यशपाल गोंगले,राजु वलके, डॉ अजीजुल रहमान खान, प्रविण सहारे, आकाश बुरीवार ,रुपाली दंडीकवार आदी मान्यवर उपस्थित होते..
अशोक घोरडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातुन शारिरीक, मानसिक, बौध्दीक व सांस्कृतिक विकास तसेच आत्मविश्वास,अनुशासन, नियोजन, सामाजिक जीवन, व सामाजिक बांधीलकी वाढून विद्याथ्र्यांचा सर्वागिण विकास होतो. असे मार्गदर्शन केले.
सदर शिबिरात श्रमसंस्कार,रस्ते दुरुस्ती, बंधारे, लोकशाही संवर्धनासाठी मतदारांत जाणीव जागृती, स्वयं रोजगार, डिजिटल साक्षरता पर्यावरण व वृक्षसंवर्धन, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, लोकसंख्या शिक्षण, घर घर भारतीय संविधान आदींची माहिती देण्यात आली, सोबतच सायबर क्राईम व महिला, सर्पदंश उपाययोजना, संतुलित आहार, यावरून मार्गदर्शन करण्यात आले..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजीजुल रहमान खान,संचालन प्रा.प्रवीण सहारे तर आभार प्रा. अंजू राजेश विघ्ने यांनी केले,कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद, गावकरी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!