Vidarbh24News

Latest Online Breaking News

सोमनाथ येथे जिवतारा फाउंडेशनची स्वच्छता मोहीम उत्साहात

मुल : मुल तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सोमनाथ येथे दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिवतारा फाउंडेशन यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत पार पडली.

या उपक्रमात एकूण १५ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले. मोहिमेदरम्यान अंदाजे ५० किलो कचरा जमा करण्यात आला तसेच १५ कचऱ्याच्या पिशव्या भरून पर्यटनस्थळ परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वयंसेवकांनी प्लास्टिक व इतर घनकचरा वेचून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन मॅकलवार, उपाध्यक्ष रोशन गोहने, कोषाध्यक्ष पंकज चौधरी, सहसचिव सतिश घोटेकर, सदस्य सुरज कांकलवार व प्रणित भोयर उपस्थित होते. तसेच माँटिन शेडमाके, सुजल गेडाम, नवनाथ मानकर, विद्युत मानकर, अंकुश चौधरी, राम घोटेकर, सौरभ पुडके, मयूर नायबनकार, वैभव चौधरी यांच्यासह इतर स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेद्वारे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!