Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीसाठी एकरी १० हजार रुपये दया

महसुल विभागाचा शासनाला प्रस्ताव सादर

आत्महत्यारोखायच्या असतील तर तेलंगणाच्या धर्तीवर अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारने एकरी दहा हजार रुपये पेरणीसाठी द्यावेत, अशी शिफारस महसूल प्रशासन राज्य सरकारला करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील 21 लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे पाच लाख कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. जूनअखेर सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षासह शासनाकडे शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांत एकरी १० हजार रुपये अर्थसाहाय्य करण्याची शिफारस करण्यात येणार आहे.
आर्थिक सक्षमतेअभावी अल्पभूधारक शेतकयांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या सव्र्व्हेतून प्रशासनाने काढला आहे. सर्व्हेत शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत थेट संवाद साधण्यात येतो.
मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओचे पथक स्वतः शेतकऱ्याच्या घरी जाऊन सर्व्हेचा फॉर्म भरून घेतात.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!