Vidarbh24News

Latest Online Breaking News

नवेगाव येथील महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

पोलिसांची चौकशी सुरू, आरोपींना लवकरच अटक होणार

गडचांदूर (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) :
मुक्काम पोस्ट नवेगाव, ता. कोरपना, जि. चंद्रपूर येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या गंभीर घटनेप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

सौ. कविता भीमप्रकाश आखेवार (वय 35 वर्ष) या मादगी समाजातील महिलेवर कालिदास देशकर, रोशनी देशकर, अनिल नगराळे व पौर्णिमा नगराळे यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेला जबरदस्तीने शेतामध्ये नेऊन अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बबलूजी आखेवार यांनी डॉ. समयाजी पशुला (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मादगी संघटना) तसेच अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शंकर पेगड पल्लीवार यांच्याशी संपर्क साधला. पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांसह दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, त्या वेळी आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल न झाल्याची व घटनास्थळी चौकशी न झाल्याची तक्रार करण्यात आली.

यानंतर समाज संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांकडून गडचांदूर पोलीस स्टेशनला मेलद्वारे आवश्यक निर्देश देण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना गडचांदूर पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले. पोलिसांनी त्यांचे सविस्तर बयान नोंदवून रात्री सुमारे 8.30 वाजता पोलीस पथक, पीडित महिला, कुटुंबीय व समाज संघटनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नवेगाव येथे घटनास्थळी जाऊन पाहणी व पडताळणी केली. घटनास्थळी पंचनामा करून प्राथमिक चौकशी करण्यात आली.

चौकशीनंतर सर्वजण परत पोलीस स्टेशनला आले. यावेळी पोलीस प्रशासनाने कालिदास देशकर, रोशनी देशकर, अनिल नगराळे व पौर्णिमा नगराळे या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

यावेळी डॉ. समयाजी पशुला – संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मादगी संघटना तथा उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जयदेव त्रिसूलवार – प्रदेश उपाध्यक्ष, शंकरजी चिट्टलवार – महासचिव, महाराष्ट्र राज्य
शंकरजी बेगड परिवार – विदर्भ अध्यक्ष, अखिल भारतीय मादगी सामाजिक संघटना, सुभाष चिंदेकर – सामाजिक कार्यकर्ते, बबलूजी आखेवार – सामाजिक कार्यकर्ते
अरुण पारखी – सचिव, ता. कोरपना, तसेच मादगी समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजात संताप :
या घटनेमुळे मादगी समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून पीडित महिलेला न्याय मिळावा व आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजबांधवांकडून होत आहे. पोलीस प्रशासनानेही प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!