Vidarbh24News

Latest Online Breaking News

सासऱ्याची हत्या करणाऱ्या जावयास जन्मठेप

सासऱ्याची हत्या करणाऱ्या जावयास जन्मठेप

सावली (लोकमत दुधे/ बाबा मेश्राम)
सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करून सासूला जखमी करणाऱ्या जावयास चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आजन्म कारावास व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा गुरुवार दि. ११ मे रोजी ठोठावली आहे. सावली तालुका मुख्यालयापासुन जवळच असलेल्या हिरापुर येथील ही घटना होती. निलकंठ कांबळे रा. हिरापुर ता. सावली असे शिक्षा झालेल्या आरोपी जावयाचे नाव आहे. तर ईश्वर मडावी असे मृतक सासऱ्याचे कौशल्याबाई मडावी असे जखमी सासूचे नाव आहे.

आरोपी निलकंठ कांबळे व मनिषा ईश्वर मडावी या दोघांचा प्रेमविवाह झालेला होता मात्र त्यांच्या

प्रेमविवाहास घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ते दोघे पती, पति किसाननगर येथे भाड्याने राहत होते. परंतु नंतर ते आपल्याच स्व गावी आणि पत्नीच्या घरी तिच्या आई वडील कडे राहत होते. सन डिसेंबर २०१९ ला दुपारी आरोपी व त्याची पत्नी मनिषा झोपडी बांधण्यासाठी लागणा-या लाकूड फाट्यासाठी जंगलात गेले होते. जंगलात त्यांच्यात वाद झाला त्याने पत्नी ला मारहाण केली, त्यामुळे ती घरी परत आली. घटनेच्या दिवशी पत्नी मनिषा, तीचे वडील व आई कौशल्याबाई मडावी व सावत्र आई
यामिनी सर्व मिळून जेवण करुन टि.वी. पाहत असताना आरोपी त्यांच्या घरी (पत्नी च्या घरी जाऊन चाकुने मारहाण केली. त्यात फियादीचे पती ईश्वर मडावी मरण पावले व ती गंभीर जखमी झाले व त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यातील आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३०२ नुसार आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सदर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी कलम ३०२ भा.दं. वि. मध्ये आजन्म कारावासाची सजा व रु. १० हजार दंड व दंड न भरल्यास १ वर्षाची सजा व कलम ३०७ भादवि मध्ये आजन्म कारावासाची सजा व ५००० रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सजा सुनावण्यात आली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!