वणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे “राज विश्राम” कक्षाची स्थापना

वणी :– ग्रामीण रुग्णालयात लस घ्यायला येणाऱ्या वडीलधारी व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून आज राज विश्राम कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.लस घ्यायला येणार्या नागरिकांना रूग्णालयात खूप वेळ थांबव लागत किंबहुना लस घेतल्या नंतर विश्रांती सुद्धा आवश्यक आहेत .
परंतु लांब अंतरावरून आलेल्या नागरिकांना हे शक्य नाही म्हणून आज राज विश्राम गृहाची स्थापना करण्यात आली .
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून व्यापारी असोसिएशन अध्यक्ष, मा नगराध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पुसद अर्बन बँक राकेशजी खुराणा,
राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर व प्रेस वेल्फेअर चे सचिव तुषार अतकरे सोबतच वणी विधानसभा क्षेत्रतील महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.