Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर येथे कोरोना काळात छुप्प्या पद्धतीत अवैध धंदे जोमात ,शेटर बंद ….मात्र रोड वर पट्टी फ़ाडने सुरुच

वणी (11 .मार्च) :– तालुक्यातील राजूर हे गाव रोजगारांचा गाव म्हणून ओळखल्या जातो .कारण येथे चुनाभट्टी व कोळसाखाणी असल्याने अनेक प्रांताचे लोक मजूरी साठी इथे पोट भरण्यासाठी येतात म्हणून ह्या राजुर गावची मिनी इंडिया म्हणून सुद्धा ओळख आहे.राजुर येथे मटका पट्टी जोरात चालू असल्याची लोकांत चर्चा आहे. सध्या गावात कोरोनाचा प्रवेश झाला असून अवैध मटका व्यवसायाचा ठिकाणी गर्दी असते .त्यांची हातमिळविणी सुद्धा असते .त्यामुळे मटका अवैद्य धंदेवाल्यांकडून शासनाने दिलेल्या सुचनाची पायमल्ली होतांना दिसत आहे.

राजूर येथे मात्र मटकापट्टी कुणाचा आशीर्वादाने आहे ? अशी देखील चर्चा गावात रंगत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे बहुतांशी पालन व्यापारी वर्गाकडून केली जाते .

परंतु मटका पट्टी धारक मात्र प्रशासनाचे डोळेझाक राजुर येथे करीत आहे.फक्त शेटर बंद मात्र मटका सुरू अशी स्थिती राजूर गावात आहे. मटका हा खुलेआम चालू आहे असेही म्हणायला काहीच हरकत नाही.दिवसभर येथे गर्दी असते.

या ठिकाणी मास्क, फिजिकल डिस्टनसिंग नाही .अशा प्रकारे शासकीय व  प्रशासकीय निर्देशनियम पायदळी तुडवून हे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु आहे.मटका हा जरी शेटर उघडून सुरु नसला तरीही छुप्या पद्धतीने महाराजांसारखे बसून असलेले चेले मात्र पट्टी फ़ाडण्यास सज्ज असल्याचे चित्र गावात आहे.

या मटक्याने रोजगार वर्ग लॉकडाउनने आधीच मागासलेला आहे ,मात्र खोट्या प्रलोभनाने ते मटका लावून आणखी घरे उध्वस्त होण्यास सुरू झाले.महत्त्वाचे म्हणजे शेटर उघडून जेवढा मटक्यात धंदा केला जातो त्यापेक्षा जास्त या बंदमध्ये चालविला जाते अशी सुद्धा चर्चा आहे.पण याकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे . हा सवाल देखील उपस्थित होत आहे.

यावर प्रशासन काय करेल व त्यांची भूमिका काय असेल. हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे .एवढ्या  छोट्या गावात अवैध धंद्यावर आळा बसणार नाही,

तर, समोर मजूर वर्गाची घरची परिस्थिती व त्यांची मानसिक परिस्थिती काय होईल समोर सांगता येणार नाही.व सरते शेवटी घर उध्वस्त होण्यास जबाबदार कोण असणार?

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!