राज्य राखीव पोलीस दल ( SRPF ) यांचा नक्षलग्रस्त जिल्ह्यातील बंदोबस्त कालावधी ०५ महिने ऐवजी ०३ महिन्याचा करण्यात आले
पोलीस बॉईज असोसिएशनच्या मागणीला आले यश- संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मानले आभार
विदर्भ 24 न्यूज
उस्मानाबाद:-पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे पोलीसांच्या विविध मागण्यांसाठी डिसेंबर २०१९ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले होते, या मोर्चामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर,या जिल्ह्यातून पोलीस बॉईज असोसिएशनचे पदाधिकारी व पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, तसेच सुमारे ३५ मागण्यांचे निवेदन तत्कालीन गृहमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले होते, यामध्ये प्रामुख्याने ही एक मागणी केली होती की, राज्य राखीव पोलीस दल ( SRPF ) यांचा नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ०५ महिन्यांचा बंदोबस्त कालावधी हा ०३ महिन्यांचा करण्यात यावा ही मागणी पूर्ण झाली असून दिनांक २४सप्टेंबर २०२० रोजी पासून आदेश लागू करण्यात येत असल्याचे परिपत्रक राज्य राखीव पोलीस बलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी मॅडम यांनी संबंधित सर्व कार्यालयात पाठवले आहे, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे व गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी स्वागत केले असून आभारही मानले आहेत,

पोलीस कर्मचाऱ्यास व होमगार्ड सैनिकांना व कुटंबीयांना काही समश्या असल्यास खालील फोन नंबर फोन करा
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य
मो-9604972682, 8669838008




