‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी ‘आरोग्य पथकांना सहकार्य करण्याचे कवठी ग्रामपंचायत चे नागरिकांना आव्हान…
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी ‘आरोग्य पथकांना सहकार्य करण्याचे कवठी ग्रामपंचायत चे नागरिकांना आव्हान…..
कवठी प्रतिनिधी :- दि. 23/09/2020
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी ‘मोहीमेस सावली तालुक्यात सुरुवात झाली असून आरोग्य पथकांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अफवांना बळी न पडता मोहीम यशस्वी करण्यास नागरिकांनी आरोग्य पथकास सहकार्य करण्याचे आव्हान ‘कवठी ‘ ग्रामपंचायत तर्फे कवठी, रुद्रापूर, सिंगापूर येथील नागरिकांना करण्यात आले.
ऑडिओ स्पीकर द्वारे मोहीमेचे आव्हान करताना नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, शरीरात अशक्तपणा जाणविणे, ऑक्सीजनचे कमी पणा वाटणे अशी लक्षणे दिसून आल्यास ‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी ‘मोहीमेतील नागरिकांना माहिती देऊन त्यांची पटकन टेस्ट करून घ्यावी, त्यामुळे वेळेवर औषधउपचार आणि विलगीकरण करून कोरोना रोगाचा प्रसार रोखता येईल.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पळा, घराबाहेर पळताना नेहमी मास्क वापरणे, वारंवार साबणाने हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजेत, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे इ. विषयी सांगण्यात आले. परंतु प्रत्येक्षात असे होताना दिसून येत नसून या उलट फेसबुक, वॉट्सअपवरील अफवांवर विस्वास ठेऊन- 1)डॉक्टरांना प्रत्येकी 1रुग्णांमागे मेल्यानंतर दीड लाख रुपये मिळतात. 2)डॉक्टर मुद्दाम रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह काढून मारीत आहेत. 3)रुग्ण मृत्यू पावल्यानंतर त्यांचे अवयव काढून टाकले जातात. 4)शासकीय रुग्णालयात गेल्यास काहीही नसतानाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह काढतात.
अश्या अफवांच्या पोस्टमुळे एखादा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यांनतरही त्याच्या संपर्कातील व्यक्तींना प्रशासनाकडून टेस्ट करण्यासाठी सांगितल्या नन्तरही अनेक व्यक्ती टेस्ट साठी पुढे येत नसल्याने कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चाललेला आहे.
आज परिस्थिती चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालय आणि खासगी रुग्णालयात बेड मिळणे कठीण होत चालले असल्यामुळे कोरोनाच्या आजाराबाबत सर्व नागरिकांनी आत्ताच सतर्क होणे खूपच गरजेचे आहे.
त्यामुळे ‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी ‘या मोहीमेअंतर्गत कवठी, रुद्रापूर, सिंगापूर या तीनही गावात 3 व्यक्तींचा पथक आपल्या घरा प्रर्यन्त आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहीमेअंतर्गत प्रत्येक व्यक्तींचा थर्मामीटरने ताप व ऑक्सीमीटरने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यात येणार आहे. आणि सर्दी, खोकला, किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या आजाराचा त्रास असल्यास पथकाला याबद्द्ल खरी माहिती देऊन पथकाला सहकार्य करण्याचे आव्हान तीनही गावातील नागरिकांना ग्रामपंचायत कवठी तर्फे करण्यात आले.



