Vidarbh24News

Latest Online Breaking News

धक्कादायक ! बीडमध्ये ‘ कोरोनाबाधित पोलिसाची लावली ड्यूटी, पुढं……

धक्कादायक ! बीडमध्ये ‘ कोरोनाबाधित पोलिसाची लावली ड्यूटी, पुढं……

विदर्भ 24 न्यूज़
ऑनलाईन/ बीड:- कोरोना कालावधीत पोलिसांचे कौतुक होत असले तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या नशिबी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे हाल सोसण्याची वेळ आली आहे. कोरोना बाधित असतानाही एका पोलिसाला सकाळपर्यंत नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागले. रात्रभर रुग्णवाहिका आली नसल्याने कर्तव्य पूर्ण करुन सकाळी कर्मचाऱ्याला दुचाकीवर रुग्णालय गाठावे लागले.
बीड जिल्ह्यातील परळी शहर ठाण्यातील 42 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा कर्मचारी बीड ह – लातूर सीमेवरील जोडवाडी येथे नाकाबंदीसाठी कर्तव्यास होता. शुक्रवारी त्यांच्या घशातीलनमुने घेण्यात आल्यानंतरही शनिवारी नाकाबंदीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचाऱ्याने दोन सहकार्यासह एका पोलीस अधिकार्यासोबत कर्तव्य बजावले. रात्री उशिरा कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यांना तातडीने कोरोना कक्षात दाखल करणे गरजेचे होते . मात्र रुग्णवाहिका पाठवण्यात आली नाही. करोना बाधा झालेली असतानाही रात्रभर पोलीस कर्मचाऱ्याने इतरांना लागण होणार नाही याची काळजी घेत कर्तव्य बजावले. रविवारी सकाळी आठ वाजता सुटी झाल्यानंतर कर्मचारी दुचाकीवर जावून परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. वाटेत त्याला काही त्रास होऊ नये म्हणून अन्य तीन सहकारी त्यांच्या दुचाकीच्या मागे वाहन घेऊन गेले होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!