Vidarbh24News

Latest Online Breaking News

सागवान तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक, दुचाकींसह सागवानी लट्ठे जप्त..

सागवान तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक, दुचाकींसह सागवानी लट्ठे जप्त

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा – आलापल्ली मार्गावर दुचाकीवरून सागवानाची तस्करी करीत असताना ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे . आरोपींकडून दोन दुचाकी तसेच लठे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. इशाक बापू दुर्गम ( २५ ) , विनोद उर्फ राकेश स्वामी दुर्गम ( २५ ) , राजेंद्र बकन्ना दुर्गम ( १ ९ ) आणि संजयसिंग रामक्रिपालसिंग राठोड ( २ ९ ) सर्व रा . सूर्यापल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . २६ जुलै रोजी रात्री सिरोंचा येथील वनपरीक्षेत्र कार्यालयात मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमडेली जंगलात गस्तीवर असताना दोन दुचाकीने ४ इसम सागवानी लठू घेवून जाता आढळून आले . आरोपींना थांबवून चौकशी केली असता सागवान तस्करी केली जात असल्याचे आढळून आले . आरोपींना ताब्यात घेण्यात आले . तसेच घटनास्थळावरून एमएमच ३४ जे ३६ ९ १ व एपी १ के १७८५ , ०.१७४ घनमीटर १० हजार ४३६ रूपये किमतीचे सागवानी लठू जप्त करण्यात आले . आरोपींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींनी खंड क्रमांक १८४ या राखीव वनामध्ये सागवान लाकडांची तोड केली . याबाबत मोका चौकशी करण्यात आली . घटनास्थळावर तोडलेल्या मालाची मोजणी केली असता ०.१ ९ ७ घनमीटर म्हणजे ११ हजार ८१६ रूपये किमतीच्या झाडांची तोड करण्यात आली . घटनेत वापरलेले इतरही साहित्य जप्त करण्यात आले . सदर कार्यवाही उपवनसंरक्षक सुमितकुमार , सहाय्यक वनसंरक्षक एस.जी. बडेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी वि.वा.नरखेडकर , क्षेत्रसहाय्यक बी.एम. खोब्रागडे , एल.एम. शेख , वनरक्षक बी.एम. नरोटे , आर . व्ही . जवाजी , डी.जी. भुरसे , पी.डी. कोडाप , एम.जे. धुर्वे , आर.वाय . तलांडी , एस.टी. तुलावी , आर.एस. पदा , वाहनचालक वाय . आर . गुणशेट्टीवार यांनी केली आहे.

बातमी व जाहीराती साठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!