*लग्नकार्यात नव दाम्पत्यांना संविधान भेट*
*समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा स्तुत्य उपक्रम*
गडचिरोली: समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा “हर घर संविधान” उपक्रमांतर्गत नव विवाहित दाम्पत्यांना संविधान भेट देऊन दिल्या शुभेच्छा .
गडचिरोली येथे दिनांक ५ मे २०२५ रोजी नारायण बोलीवार यांची मुलगी अवंती आणि सुधाकर गोरडवार यांचा मुलगा रोहीत यांच्या विवाह सोहळ्यात नवविवाहित दाम्पत्याला भारताचे संविधान आणि अस्पृश्यता निवारण, बुद्ध आणि त्याच्या धम्म हि पुस्तके भेट देण्यात आली.
ही अनोखी भेट समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या “हर घर संविधान” या उपक्रमाअंतर्गत देण्यात आली. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक घरात संविधान पोहोचवणे व लोकांमध्ये संविधानाचे महत्त्व पटवून देऊन लोकांमध्ये जनजागृती करणे आहे. सदर वेळी संघटनेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले प्रत्येक कुटुंबाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित दिलेल्या संविधानाचा अभ्यास करून पुढील पिढ्यांमध्ये जागृती निर्माण करुन मानवी हक्क आणि अधिकार तसेच सामाजिक अडचणीवर संविधानाच्या आधारेच तोडगा काढता येतो असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा मायाताई लक्ष्मण मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते राजेश कालगट्टीवार, संदिप येंगनदलवार, रुपचंद लाटेलवार वधु अवंती बोलीवार वर रोहीत गोरडवार, नारायण बोलीवार, उत्तराबाई बोलीवार व समाज बांधव भगिनी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



