Vidarbh24News

Latest Online Breaking News

आधारभूत धान खरेदी नोंदणी मुदत वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

सावली – आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती मात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असतांना नोंदणी केंद्राची संख्या कमी, लिंक फेलची अडचण यामुळे अजूनही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात तहसीलदार सावली यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.

शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीसाठी नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. परंतु खरेदी केंद्राने नोंदणीवर बहिष्कार टाकल्याने नोव्हेंबर महिन्यात एकही नोंदणी झाली नाही. डिसेंबर मध्ये ऑनलाईन नोंदणीला सुरवात झाली मात्र कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे शासनाने 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी मुदत वाढवली. नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने 4-5 दिवस रांगेत राहिल्यावर नोंदणी होत असे. त्यातच लिंक फेलची अडचण येऊ लागली. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत. शेतकरी बोनसपासून वंचित राहू नये म्हणून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी सभापती विजय कोरेवार यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे निवेदनातून केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!