Vidarbh24News

Latest Online Breaking News

*ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – रवींद्र मुप्पावार*

*ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – रवींद्र मुप्पावार*

*विश्वशांती विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*

सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
ज्ञान हा मानवी जीवनाचा आधार आहे,विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविणे आणि राखणे,तसेच त्यांना चालना देण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले पाहिजे.बाबासाहेबांची विध्वता,शैक्षणिक योग्यता ,प्रतिभा व्यापक आणि भव्य होती.समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.बाबासाहेबांचे विद्यार्थ्यांची अतूट संबंध होते.त्यांनी विद्यार्थ्यांनो जागृत रहा या लेखात त्यांनी त्यांचे शिक्षण काळातील महत्त्व विशद केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे अथांग सागर होते.असे अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विश्वरत्न,महामानव,अर्थतज्ञ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते.तर प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,श्वेता खर्चे,सहाय्यक शिक्षक किशोर संगिडवार मंचावर उपस्थित होते.
जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक धनंजय गुरनुले आणि शरदचंद्र पोहनकर यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक,सामाजिक,तत्कालीन धार्मिक कार्यावर प्रकाश टाकला.जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्याकडून भाषणे आणि गीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षक सुधीर जीवतोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!