Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रीय आर्थिकदृष्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे सुयश

राष्ट्रीय आर्थिकदृष्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे सुयश

सावली: रमाबाई आंबेडकर विद्यालयातील राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिखवृत्ती परीक्षेत 2023-24 मध्ये एकुण 44 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 30 विदयार्थी पास झालेले आहे त्या 30 विद्यार्थ्यापैकी 9 विद्यार्थीची शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे व 4 विद्यार्थ्यांची छत्रपती शाहू महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे.

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिखवृत्ती परीक्षेत एनएमएमएस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत दौलत बोरकर, कु अर्थिता पितांबर वाकडे, भार्गव चंदू अडवलवार, श्रवण रविंद्र पुप्रेड्डीवार, स्वरीत संदिप मेडपल्लीवार, कु सिमरन कैलास गेडाम, श्रीया रूपेश वाकडे, कु डिम्पल आनंदराव पिपरे, खुशी ओमप्रकाश सहारे हे विद्यार्थी पात्र झालेले आहेत. पात्र ठरलेच्या विद्यार्थ्यांना 8 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीला 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज सारधी शिष्यवृत्तीसाठी 4 विदयार्थी पात्र झालेले आहेत त्यामध्ये नैतिक दिपक जवादे, कु मृणाली सुरेश कुरुडकर, उन्नती विलास ठाकरे, यथार्थ डिवेज आभारे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षामध्ये 38,400 रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या सर्व विद्यालयाचे शिक्षक एच आर कस्तुरे, जी एन मेश्राम, माया निमसरकार विद्यालयाचे मुख्याधापक एन एल सेंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष के एन बोरकर, संस्था सचिव प्रा वि सी गेडाम, बि  के गोवर्धन, सौ सि आर गेडाम, डी बी गोवर्धन, शाळेचे मुख्याध्यापक एन एल शेंडे, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!