Vidarbh24News

Latest Online Breaking News

*अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म.रा.) कार्यकारिणी गठित*

*चंद्रपुर शहर अध्यक्षपदी रुपेश वालकोंडे यांची निवड तर महिला प्रदेशाध्यक्षपदी मायाताई सॅन्ड्रावार यांची नियुक्ती*

चंद्रपूर: जिल्ह्यातील व्हिआयपी विश्रामभवन येथे अखिल भारतीय मादगी समाज संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने १७ सप्टे. २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन देवतळे, जेष्ठ सा.कार्यकर्ते किशोर नगराळे, प्रदेश संघठक गोंविदा कामरेवार, प्रदेश सल्लागार एल.मोहुर्ले, प्रदेश अध्यक्ष रुपचंद लाटेलवार यांच्या मार्गदर्शनात सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये बंडू बोलीवार यांची शहर संघठक, विनोद आसमपेल्लीवार जि.कार्याध्यक्ष, ज्योतीताई आसमपेल्लीवार महिला जिल्हाध्यक्षा, सुनिताताई नगराळे महिला कार्याध्यक्षा, ॲड.मेघा पोवनकर कायदेविषयक सल्लागार, विनोद बच्चलवार जिल्हा उपाध्यक्ष, अजय मोहुर्ले ता.अध्यक्ष कोरपना अशाप्रकारे नवनियुक्त करण्यात आली. नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन.
यावेळी समाजाची दशा आणि दिशा या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली, अनमोल वेळ समाजासाठी देऊन होणाऱ्या कार्याचे साक्षीदार व्हाल,वेळेला महत्व देऊन समाजकार्य आपल्या हातून घडो व आणि वेळोवेळी युवा तरुणांना साथ द्यावी,असे संघठनेचे अध्यक्ष मोहन देवतळे,यांनी आपल्या मार्गदर्शनात मनोगत व्यक्त केले व बैठकीचे सूत्रसंचालन गजू आलेवार तर आभारप्रदर्शन सौरव जिल्हेवार यानी केले
सभेला संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य गण आणि समाज बांधव उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!