Vidarbh24News

Latest Online Breaking News

सोनार समाज बहुउद्देशिय संस्थेची कार्यकारिणी गठित

दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोज रविवारला राजुरा येथे सोनार समाज बहुउद्देशिय संस्था जिल्हा चंद्रपूर द्वारा. सर्व शाखेय सोनार समाज बांधवांची  बैठक स्वयंवर मंगल कार्यालय येथे घेण्यात आली…
त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  प्रफुल चावरे अध्यक्ष/ संस्थापक सो. स.बहु.संस्था चंद्रपूर,  सुमेध कासुलकर कोषाध्यक्ष. प्रवीण जुमडे ज्येष्ठ मार्गदर्शक. ॲड. प्राशिष ताठे जिल्हाकार्यद्यक्ष. संदीप चावरे जिल्हा महासचिव. आशिष यमनुरवार जिल्हा सचिव व राजुरा शहरातील सोनार बांधव व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…


समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व येणाऱ्या काळात शहरातील व तालुक्यातील सर्व शाखेतील समाज बांधवांना एकत्रित आणण्याचे कार्य करणार असे सर्व उपस्थित मान्यवरांनी हमी दिली. श्री सुमेध भाऊ कासुलकर, यांनी सोनार समाज बहुउद्देशिय संस्थेचे उद्दीष्ट व कार्य सर्वांना समजवून सांगितले तसेच प्रवीण जुमडे, संदीप चावरे,  ॲड प्राशिश ताठे, प्रफुल चावरे यांनी समाज बांधवांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव आशिष यमनुरवार व संदीप पांढरे यांनी केले..
सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत राजुरा तालुका व शहराची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पदी राकेश भाऊ चिलकुलवार, कार्यध्यक्ष पदी  संतोष भाऊ भाटपल्लिवार, उपाध्यक्ष गजेंद्र भाऊ शेरेकर, सचिव अरूनराव बुटे, महासचिव प्रकाश भाऊ मेडपल्लीवार, कोषाध्यक्ष गोपालजी अडानिया, शहर अध्यक्ष पदी संदीप भाऊ पांढरे व सचिव  दिपक भाऊ लुथडे यांची नियुक्ती करण्यात आली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!