*वर्ग १० वी व १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
मान.शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे आदेशानुसार व गट शिक्षणधिकारी पंचायत समिती सावली यांचे मार्गदर्शनात स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे फेब्रू./मार्च २०२३ या परीक्षेमध्ये १२ वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.तर १० वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रमाबाई आंबेडकर विद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली.दोन्ही शाळेतील एक दिवसीय कार्यशाळा ही श्री.लोकनाथ खंडारे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली यांचे मार्गदर्शनात पूर्ण झाली.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक चंद्रशेखर प्यारमवार व मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार, यांनी कार्यशाळेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन केले.नियंत्रक अधिकारी म्हणून श्रीरंग कुंभरे वी.अ.शी.व्याहाड,लोमेश बोरेवार केंद्र प्रमुख,सावली, नितीन रामटेके,गजानन पाटील विषय साधन व्यक्ती सावली उपस्थित होते.
उपरोक्त समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ तालुक्यातील १०वी व १२ वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यशाळेला सावली पंचायत समितीतील विविध विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.



