Vidarbh24News

Latest Online Breaking News

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे महाअधिवेशन तिरुपती येथे होणार

*आंध्राप्रदेशचे मुख्यमंत्री उद्घाटन करणार*.
(विजयवाडा) राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वें महाअधिवेशन ७आगस्ट 2023 ला श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटी स्टेडियम तिरुपती येथे सकाळी 9 ते साय 5 वाजे पर्यंत होणार असून या अधिेशनासाठी उद्घाटक म्हणून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी उपस्थित राहणार असून दिनांक 13 जून ला विजयवाडा येथे झालेल्या भेटीत त्यांनी निमंत्रण स्विकारलेले आहे , त्यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक जस्टिस इश्वरेया , राष्ट्रीय ओबसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे , बिसि वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आध्रा प्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष केसंना शंकर राव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रा अनिल शिंदे ,क्रांतीकुमार, ॲड किशोर विक्रम गौड,उपस्थित होते. स्व. व्ही. पी सिंग यांनी 7आगस्ट 1990 मंडल आयोग लागू केला होता ,या दिवसाची आठवण म्हणून या तारखेला दरवर्षी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन देशाच्या विविध राज्यात आयोजित करून ओबसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधून त्या पुर्ण करण्याकरिता सतत पाठपुरावा केला जातो. या अधिवेशनात जातनीहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रीमीलेरची मर्यादा मागील सहा वर्षा पासून वाढली नाही आहे ती वाढविण्यात यावी, ५०%आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी,आदी मागण्या मंजूर करवून घेण्या साठी व 26 मागण्यांवर मान्यवारांच्या उपस्थितीत या अधिवेशनात चर्चा होणार असून त्या पूर्ण करण्या समंधी ठराव पारित करून केंद्र सरकारला ते पूर्ण करण्यासाठी सादर केले जाणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!