नवभारत विद्यालयाची रेहानी कोहळे (९४.००%) तालुक्यात प्रथम
रमाबाई आंबेडकर विद्यालयाची श्रुती मराठे तालुक्यात व्दितीय (९१.६०%)
रमाबाई आंबेडकर विद्यालयाची सुप्रिया लाडे तृतीय (९१.२०%)
सावली: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रूवारी – मार्च २०२३ च्या उन्हाळी ( दहावी) परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून नवभारत विद्यालयाची व्याहाड रेहानी प्रविण कोहळे (९४.००%) तालुक्यात प्रथम,
रमाबाई आंबेडकर विद्यालय सावलीची श्रुती मनोज मराठे तालुक्यात व्दितीय (९१.६०%), तर
रमाबाई आंबेडकर विद्यालयाची सावलीची सुप्रिया सदाशिव लाडे तृतीय क्रमांक (९१.२०%) घेउन बाजी मारली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज रोजी उन्हाळी परीक्षा ईय्यता १० वी चा निकाल घोषित केला. सावली तालुक्यात इयत्ता दहावीचे २१ विद्यालये असून नवभारत विद्यालय व्याहाड बुजचां निकाल ९५.७९% रमाबाई आंबेडकर वि . सावली ८९.८०% , जिल्हा परिषद हायस्कूल निमगाव १०० टक्के, विश्वशान्ति वि. सावली ८१.४५ शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय ९३.५६%, विकास विद्यालय विहिरगाव ९८.२०% , ईदिरा गांधी विद्यालय पालेबारसा ८४.४८% , ९२.८५% ,संत गजानन महा.विद्यालय पेढ़री ९७.८२% , भैयाजी पाटिल भांडेकर वि . कापसी ९९.१४% , प्रवीन भाऊ आडेप्वार वि. निफान्द्र ९५.००% ,निकाल लागला असून उतीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करीत पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या ……



