Vidarbh24News

Latest Online Breaking News

*मंदिरा देवतळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित*

सावली: तालुक्यातील चिचबोळी येथील मंदिरा संतोष देवतळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
भारत सरकार अंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. मंदिरा देवतळे या समाजातील महिलांना एकत्रित करून महिला सक्षमीकरण व समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात, विशेष म्हणजे गावातील दारुबंदी साठी पुढाकार घेऊन त्यासाठी सतत कार्यरत आहेत, तसेच विविध सामाजिक व शासकीय उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढे येवून मोलाचे योगदान देत असतात, सध्या आशावर्कर महिला म्हणून काम करीत आहेत आणि अ.भा.मादगी समाज संघठना म.रा. मध्ये महिला संघठिका म्हणून काम करतात. अशा विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन ३१ मे रोजी चिचबोळी ग्रामपंचायत येथे चिचबोळी ग्रामपंचायतचे सरपंच सतिश नंदगिरवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल पती संतोष देवतळे, मोहनभाऊ देवतळे, संगरक्षित बांबोळे, अनिल बोटकावार,धम्मराव तानादु, एल.मोहुर्ले, विजय देवतळे, रुपचंद लाटेलवार व गावातील व्यक्तीकडून अभिनंदन केल्या जात आहे .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!