Vidarbh24News

Latest Online Breaking News

क्रातीज्योती सावित्रीमाई स्मृति दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याची धगधगती मशाल क्रांतीजोती सावित्रीमाई फुले.

हजारो वर्षांपासून गुलामीचं जीवन जगणाऱ्या महिलांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवणारी आधुनिक काळातील स्त्री स्वातंत्र्याची धगधगती मशाल म्हणजे सावित्रीमाई फुले.3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या खेडेगावी जन्माला आलेल्या सावित्रीमाई फुले अखंड भारत देशातील महिलांना मोकळा श्वास घेता यावा या साठी संघर्ष करतात.भारतीय स्त्रियांना शिक्षण घेता यावे या साठी धर्ममार्तंडांचा रोष पत्करतात. प्रसंगी स्वतः चं हक्काच घर ही त्यांना सोडावं लागतं. त्यांच्या त्या त्यागामुळे आजच्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना आपल्याला पहायला मिळतात. अनिष्ठ रूढी परंपरा, सती प्रथा, केशवपण, बालविवाह, वाघ्या मुरळी प्रथा या गोष्टींच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा हा स्त्री स्वातंत्र्याचा लढा होता. सर्व प्रकारच्या जाचक रूढी मधून स्त्रियांची मुक्तता हाच सावित्रीमाई फुलेंच्या संघर्षाचा केंद्रबिंदू होता.
जेंव्हा समाजात प्रचंड जातीभेद होता, उच निचता होती, अश्या काळात जातीभेद नाहीसा व्हावा म्हणून सावित्रीमाई फुले सर्वजातीय महिलांचे हळदी कुंकूवाचे कार्यक्रम घेत होत्या. खरंतर जातीवाद्यांना आणि धर्मवाद्यांना हे एक प्रकारचं आव्हानच होतं. मुलगी शिकली तर धर्म बुडेल अशी आरोळी ठोकणारांच्या कानाखाली काढलेला चपराक म्हणजे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात करत असलेली प्रगती होय.दुष्काळाच्या कठीण प्रसंगी अन्नान्न करणाऱ्या हजारो मुलांच्या भुकेची व्यवस्था करणाऱ्या राष्ट्रमाता म्हणजे सावित्रीमाई होत्या.
ज्या काळात स्त्रिया लिहू वाचू शकत नव्हत्या त्या काळात सावित्रीमाई फुले स्वतः शिकून स्त्रियांना शिकवण्यासाठी घराबाहेर पडत होत्या. परंतु मनूवाद्यांना हे कृत्य म्हणजे धर्मविरोधी कृत्य वाटत होतं म्हणून सावित्रीमाई फुले स्त्रियांना शिकवायला जात असताना त्यांच्या अंगावर शेण चिखल फेकून त्यांना अपमानित करण्याचं काम हे मनुवादी करत होते. परंतु मनुवाद्यांच्या कुठल्याच त्रासाला न जुमानता सावित्रीमाई स्त्री शिक्षणाचं क्रांतिकारी कार्य पार पाडत होत्या. समाजाला कवितेतुन इतिहास सांगत होत्या. काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर या सारख्या काव्यसंग्रहातुन त्या उद्याच्या पिढीसाठी आदर्शवत लिखाण करत होत्या. प्लेग नावाच्या आजाराने जेंव्हा लोकं तापेने फनफणून जात होती त्या वेळी प्लेग च्या विरोधात जनजागृती करून रोग्यांची सेवा करणं त्यांना हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाणं इत्यादी कामं एक महिला असताना सुद्धा सावित्रीमाई फुले करत होत्या. एकंदरीत आपलं उभं आयुष्य समाजासाठी समाजाच्या उन्नती साठी खर्च करणाऱ्या या लढवय्या योद्धा स्त्रीला प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना प्लेग ची लागण झाली आणि त्याचं दरम्यान सावित्रीमाई फुलेंचा मृत्यू झाला. शरीर रुपाने जरी आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार, कार्य आजही जिवंत आहे. अश्या या महामातेस स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

चंद्रहास मोरेश्वर ईटकलवार
8459174128

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!