Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विधान परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापले

*विधान परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापले*
*महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणूक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ*
प्रतिनिधी:
राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाचे जागेसाठी निवडणूक होणार आहे.या निवडणुकीसाठी 12 जानेवारी पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद,नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे.त्यामुळे या निवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सदर निवडणुकीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी आपली भूमिका स्पष्ट केले असून जो उमेदवार जुन्या पेन्शनच्या बाजूने उभा राहील, जुन्या पेन्शनची मागणी लावून धरेल अशाच उमेदवाराला संघटना पाठिंबा देणार असल्याचे राज्य कार्यकारिणीने जाहीर केले असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून कंबर कसली होती.*VOTE FOR OPS* हे ब्रीदवाक्य समोर ठेवून संघटना काम करेल हे स्पष्ट दिसते.
नागपूर शिक्षक मतदार संघासाठी सुधाकरजी अडबाले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले असून सदर उमेदवार हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुरस्कृत असून नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी सुधाकरजी अडबाले यांना आपला पाठिंबा दिला असून विजयश्री खेचून आणू असा निर्धार केला आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना असून नुकत्याच झालेल्या २७ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर निघालेल्या मोर्चाने ते स्पष्ट केले. सदर मोर्चाची धास्ती विद्यमान सरकारने घेतली हे स्पष्ट दिसते.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावली तालुका संघटनेच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये तालुका कोर कमिटी स्थापन करण्यात आली. त्यात प्रा.राजू केदार,प्रा.देवानंद दुधे,प्रा.शेखर प्यारमवार, प्रा.चोपराम कोचे, निखिल मेकर्तिवार,श्रीधर बरडे,आस्तिक दुधे यांची निवड करण्यात आली. येत्या ३० जानेवारीला या निवडणुकांसाठी मतदान, तर मतमोजणी २ फेब्रुवारीला होईल. तालुका कोर कमिटीने मा. सुधाकर अडबाले यांना पसंती क्रमांक 1 चे मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!