वनमंत्री अँक्शन मोडमध्ये
वनमंत्री अँक्शन मोडमध्ये
वनमंत्रानी विदर्भ २४ न्यूजच्या मुख्य संपादकांना भ्रमणध्वनीद्वारे साधला संपर्क
विदर्भ २४ न्यूजचे मुख्य संपादक रुपचंद लाटेलवार यांनी दिनांक 10 डिसेंबरला मानवाधिकार दिनी वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना खुले पत्र लिहिले होते आणि ते सर्व सोशिअल मिडीयावर प्रसारित केले होते आणि आज सकाळी रुद्रापूर येथील वाघाच्या हमल्याची बातमी आपल्या पोर्टलवर लावली होती ती बातमी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा संयोजक राकेश कोंडबत्तुलवार आणि भाजपा युवा कार्यकर्ते राकेश विरमलवार यांनी सुधिरभाऊंच्या लक्षात आणून दिली.

पत्रावर आणि बातमीवर अँक्शन घेऊन आज सुधीरभाऊंनी विदर्भ २४ न्यूजच्या मुख्य संपादकाला भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला व वाघाचा बंदोबस्त कसा करायचा याविषयी उपाय योजना जाणून घेतली. रुपचंद लाटेलवार यांनी जंगला भोवती काटेरी तारेचे कंपाउंड करण्याचे, जंगलामध्ये प्राण्यासाठी पाणवठे बांधण्याचे तसेच वन्यप्राण्यांना शिकारीची(भोजनाची) जंगलामध्येच सोय करण्याचे सुचविले. जेणेकरून वन्यप्राणी गावात किंवा शहरात येणार नाही आणि शेतकरी, शेतमजूर आणि निरागस बाळांवर हमला करणार नाही.

तात्कालिक मदत म्हणून वनविभागाच्या तुकडीला रुद्रपुरला वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले आहे.
वनमंत्री तथा पालकमंत्री सुधिरभाऊं किती कर्तव्यदक्ष आहेत याची प्रचिती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनाच नाहीं तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरीकांना आली आहे.



