Vidarbh24News

Latest Online Breaking News

महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील विरोधात गुन्हा दाखल करा*

*महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील विरोधात गुन्हा दाखल करा*

*वंचित बहुजन आघाडीने दिले तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन+

सावली-(रुपचंद लाटेलवार)…-महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागुन शाळा उभारल्या असे वादग्रस्त विधान केले ,त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करावी व शाई फेक प्रकरणातील दोषीची मुक्तता करावी ,यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका सावलीच्या वतीने महाराष्ट्रचे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले ,
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 डिसेंबर ला,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळात सरकारी अनुदान नसतानाही भिक मागुन शाळा उभारल्या असे वादग्रस्त विधान करून महापुरुषाचा अवमान केला,यामुळे तमाम बहुजन बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत,व कायदा व सुव्यवस्था ला अशा बोचक विधानामुळे धोक निर्माण होत असतो त्यामुळे त्यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करून शाईफेक प्रकारणातील दोषीची निर्दोष मुक्तता करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी वंचित चे जिल्हा संघठक विलास माहोरकर,तालुका अध्यक्ष भास्कर आभारे,शहर.अध्यक्ष. रोशन बोरकर,वेणूताई बोरकर,गिरजाशंकर दुधे.संजय घडसे,चंदाताई बांबोळे,सौ चंद्रभागा गेडाम, संपना दुधे,रंगारी सौ गोंगले,सौ रामटेके सह वंचित चे कार्यकर्ते उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!