Vidarbh24News

Latest Online Breaking News

विवाहाकरिता पाच लोकांच्या मर्यादेत बँड पथक उपस्थित ठेवता येणार

जिल्ह्यात विवाहाकरिता पाच लोकांच्या मर्यादेत बँड पथक उपस्थित ठेवता येणार

विवाह परवानगी देण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अधिकार

चंद्रपूर, दि.12 जुन: चंद्रपूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, या आदेशानुसार विवाह करिता परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून विवाह करिता 50 व्यक्ती तर पाच लोकांच्या मर्यादित बँड पथक उपस्थित ठेवता येणार आहे.कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विवाहाकरिता 50 व्यक्तींच्या उपस्थितीत शासनाकडे यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून विवाहाकरिता परवानगी आहे.तसेच, पाच लोकांच्या कमाल मर्यादेत बँड पथक उपस्थित ठेवून विवाहाकरिता परवानगी देण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी तथा सब डिव्हिजनल इन्सिडेंट कमांडर यांना त्यांचे क्षेत्रात अधिकार असतील. परंतु, कंटेनमेंट क्षेत्रातील व्यक्तींना विवाह करिता परवानगी देता येणार नाही.
वरील आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270, 271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानुन नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!