Vidarbh24News

Latest Online Breaking News

वन्य प्राणी बिबटाची शिकार

वन्य प्राणी बिबटची शिकार

चंद्रपूर वनविभागा अंतर्गत सिर्सी नियतक्षेत्रातील घटना

चंद्रपूर,दि. 12जुन: चंद्रपूर वनविभागाअंतर्गत सावली परिक्षेत्रातील सिर्सी बिटाच्या कक्ष क्रमांक 1534 मधील वनक्षेत्रात वन्य प्राणी बिबट्या शिकार झाल्याची घटना घडली. अज्ञात इसमाकडून रानडुक्कराची शिकार करण्याकरीता लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये वन्यप्राणी बिबट अडकला.

क्षेत्रिय कर्मचारी गस्तीवर असतांना हा प्रकार निदर्शनास आला त्यावेळी बिबट जिवंत होता. रेस्क्यु ऑपरेशन करीता तातडीने टिम बोलविण्यात आलेली होती. परंतू,रेक्स्यु टिम घटनास्थळी पोहचण्या अगोदर बिबटचा मृत्यू झालेला होता. मोकास्थळी शवविच्छेदनाची कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी टि.टि.सी चंद्रपूर डॉ.कुदंन पोडचेलवार, पशुवैद्यकीय अधिकारी मुल डॉ. रोहीनी अरबळ यांनी विभागीय वन अधिकारी सोनकुसरे,वन्य प्राणी संरक्षण संस्था सदस्य मुकेश भांदककर,उमेशसिंह झिरे  व पोलीस पाटील उपरी श्रीकृष्ण मुरसे,  वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली जी.व्ही.धाडे तसेच वनकर्मचारी यांचे समक्ष पुर्ण करून त्याच ठिकाणी दहन करण्यात आले.

सदर प्रकरणाचा तपास सुरू असून आजपर्यंत 19 संशयीत इसमास चौकशी करीता ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास सुरू आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!