Vidarbh24News

Latest Online Breaking News

मारेगाव येथे भाष्कर पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान

•11 में रोजी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच मेळाव्याचे आयोजन

मारेगाव:- मारेगाव येथे 11 में रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सरपंच मेळावा व आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार,उदघाट्क यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकचे उपाध्यक्ष संजय देरकर तर विशेष अतिथी म्हूणन माजी आमदार विश्वास नांदेकर. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकर उपस्थित राहणार आहे.तर स्वागता अध्यक्ष म्हणून कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे आहे.

तसेच प्रमुख पाहुणे म्हूणन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वसंतराव आसुटकर माजी जि प. सदस्य अनिल देरकर,माजी जि. प. सदस्य सौ अरुणाताई खंडाळकर,माजी पं. सभापती सौ. शीतलताई पोटे, माजी उपसभापती संजय आवारी, माजी पं. सदस्य. सौ सुनीताताई लालसरे तसेच तहसीलदार दीपक पुंडे, गटविकासअधिकारी गोपाल कल्हारे, ठाणेदार राजेश पुरी, शंकर लालसरे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक अ‍ॅड.रुपेश ठाकरे हे उपस्थित राहनार आहे.

या कार्यक्रमास तमाम सरपंच, उपसरपंच,ग्रा.प.सदस्य तथा परिसरातील तमाम जनतेनी उपस्थित राहावे. व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड देवा.पाचभाई,तालुका अध्यक्ष अविनाश लांबट. तालुका सचिव सुरेश लांडे,तालुका उपाध्यक्ष मालाताई गौरकार,जगदीश ठेंगणे, प्रविण नान्हे,चंदुजी जवादे,सुरेखा चिकराम, पांडुरंग ननावरे,विनोद आत्राम, रविराज चंदनखेडे,प्रेमीला आदेवार, नीलिमा थेरे, दिलीप आत्राम,चंद्रकांत धोबे, शारदा गौरकार, वैशाली परचाके,राहुल आत्राम आदींनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!