Vidarbh24News

Latest Online Breaking News

खा.धानोरकरांच्या मध्यस्तीने अखेर रस्त्याच्या उपोषणाची सांगता……..

• अफजल पठाण यांच्या मागणीला यश

• गौरीशंकर खुराणा व नंदेश्वर आसुटकर यांचा पुढाकार

मारेगाव( 7.मे ):- करणवाडी ते शिबला या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करा. या प्रमुख मागणीसाठी नवरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता अफजल खान युनूस खान पठाण हे येथील तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले होते.सामाजिक कार्यकर्ता गौरीशंकर खुराणा व नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांच्या पुढाकारातून खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या मध्यस्थीने अखेर उपोषण सुटले असुन अफजल पठाण यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

मारेगाव तालुक्यातील करणवाडी,नवरगाव,सगणापूर,म्हैसदोडका,रोहपट ते झरी तालुक्याच्या हद्दीतील शिबला मार्गाचा रस्ता पूर्णतः उखडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.हा रस्ता दूतर्फ बाजुस अरुंद असल्याने किरकोळ अपघात नित्याचीच बाब झाली आहे.तसेच रस्त्याच्या दैनिय अवस्थेमुळे दुचाकीस्वारांच्या मणक्याच्या आजारात कमालीची वाढ झाली.रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण होवून सुद्धा यावर प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने,नवरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता अफजल खान युनूस खान पठाण यांनी दखल घेत.या प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसा पासुन लढा देत होते.

8 एप्रिल रोजी या रस्त्याच्या मागणीसाठी महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री,आमदार, सार्वजनिक बांधकाम विभागासह आदींना निवेदन पाठवण्यात आले होते.तसेच रस्त्याचे काम चालू न केल्यास 5 मे पासून आपण आमरण उपोषण करू असा इशाराही निवेदनाद्वारे अफजल पठाण यांनी दिला होता.मात्र प्रशासनाने निवेदनाची कुठलीच दखल न घेतल्याने 5 मे पासुन ते मारेगाव येथील तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले असता, या उपोषणास पाठिंबा देत सामाजिक कार्यकर्ता गौरीशंकर खुराणा व नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांनी पुढाकार घेवून खासदार बाळू भाऊ धानोरकरांच्या मध्यस्थीने उपोषणास विराम दिला.खा.धानोरकर यांनी बांधकाम विभागाचे अभियंता व तालुका प्रशासनाशी यावर चर्चा करुन रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या कागद पत्राची पूर्तता करीत लवकर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

खा.धानोरकर यांचे वतीने गजानन किन्हेकार,गौरीशंकर खुराणा,नंदेश्वर आसुटकर ,अरुण नक्षणे,आदींनी शीतपेय पाजून उपोषणाची सांगता केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आरेवार,आसुटकर,नायब तहसिलदार भगत आदी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!