Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे 7 में रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

•पक्षकारांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन

वणी (6 मे ):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशावरुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे शनिवारी दि. 7 में 2022 रोजी सकाळी10.30 वाजता वणी न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होऊन पक्षकारांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी वणी तालुका विधी सेवा समितीने केले आहे.

न्यायलयाची प्रक्रिया क्लिष्ट आहे. न्यायालयात असंख्य प्रकरणे तुंबून पडली आहेत. त्यामुळे गोरगरीबांना जलद गतीने न्याय देण्याचा उद्देश साध्य होत नाही. पक्षकारांची वेळ व पैशाची बचत करण्यासाठी लोकन्यायालय उपयुक्त असून याद्वारे सामोपचार तडजोडीतून न्यायालयीन प्रकरणात दोन्ही बाजूंचे समाधान होउ शकते. न्यायालयावरचा भार कमी होउन गोरगरीबांना समाधानाने व लवकर न्याय मिळू शकतो. त्यामुळे लोक न्यायालयाकडे लोकांना कल वाढला आहे. या प्रक्रियेत लोकांमध्ये लोकन्यायालया विषयी अधिक विश्वास निर्माण झाल्यास लोकन्यायालयाची चळवळ अधिक बळकट होउ शकते.

म्हणून उद्या दिनांक 7 मे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायलयात मोटार वाहन कायदा अंतर्गततची प्रकरणे निगोशिएबल इन्टुमेंट अॅक्ट कायद्या अंतर्गतची कमल 138 ची प्रकरणे बँक व फायनान्स कंपनीचे वसुली प्रकरणे, भुसंपादन प्रकरणासह शेतजमिनी विषयक प्रकरणे, कर भरणा, वीज बिल पाणी बील प्रकरणासह फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, वैवाहित व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश राहणारे आहे. या न्यायालयासाठी न्यायाधीश, वकील व सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असलेले पॅनल्स तयार करण्यात आले आहे. या लोक न्यायालयाला पक्षकारांनी सहयोग द्यावा, असेही आवाहन करण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!