पिसगाव सोसायटीवर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा झेंडा
मारेगाव( 4 मे) :-तालुक्यातील पिसगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नुकत्याच काल झालेल्या निवडणुकीत जय जगन्नाथ सहकार पॅनल ला पराभुत करत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळविला.
डॉ. महेंद्र लोढा यांचे मार्गदर्शनात मारोती गौरकार,गणुजी थेरे,अंकुश माफुर,राजु पाचभाई, भुषण कोल्हे,आकाश बदकी यांचे नेतृत्वात पिसगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक लढविण्यात आली.या निवडणुकीत 663 पैकी 535 सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यात जय जगन्नाथ सहकार पॅनल ला पराभूत करत,शेतकरी विकास परिवर्तन पॅनल चे विनोद आत्राम,वासुदेव कुमरे, सुदर्शन टेकाम,गुणवंत मडावी,श्रीकृष्ण मडावी,रामकृष्ण यरकाडे,भुषण कोल्हे,राजु पाचभाई, फुलवंती जुमनाके, वंदना सिडाम,दिवाकर हस्ते,गणूजी थेरे,विजय घोरपडे यांनी अतातटीच्या सामन्यात अखेर विजय मिळवला.



