Vidarbh24News

Latest Online Breaking News

राम शेवाळकर परीसरच्या हद्दीत सिनेस्टाईलने युवकावर प्राणघातक हल्ला.

•पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती उघड

•दामले फैलात एकच धावपळ उडाली..

वणी( 5 .मे ): जुन्या भांडणाच्या कारणावरून दुचाकीवर आलेल्यानी संगनमत करून  हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून त्यांला गंभीर जखमी केल्याची ही घटना राम शेवाळकर येथिल हद्दीत येथे काल दिनांक 4 मे राेजी रात्री 10.00 वाजताचा सुमारास घडली. या प्रकरणी वणी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,हरीषच्या आईने दिलेल्या जबाबात नमूद केल्यानुसार, जखमी युवक हा दामले नगरातील रहिवासी आहे.वणी शहरात 3 महिन्यापूर्वी सेवा नगर व दामले फैलातील युवकामध्ये किरकोळ वाद झाला होता.याच किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी राम शेवाळकर परीसरच्या हद्दीत सिनेस्टाईल मारहाण करण्यात आल्याची घटना काल दिनांक 4 मे ला रात्री 10 वाजताच्या दरम्यान घडली.

झुंड बनवुन आलेल्या दुचाकीने आलेल्या रामशेवाळकर परीसरात मारेकऱ्यांनी  हरिष रायपुरे वय 19 वर्ष याचा डोक्‍यावर्  लाकड़ी दंड्याने ,लाथाबुक्यानी व राडने हातावर, पायावर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे ठिका संजय रायपुरे  जखमी अवस्थेत होता दामले फैलात एकच धावपळ उडाली. काय झाले म्हणून मदतीला धावणाऱ्यांनाही झुंड बनून मोटरबाइकने आलेल्या हल्लेखोर  निघून गेल्यावर त्या परीसरात असलेल्या तरुणांनी त्याला जखमी अवस्थेत हरीष उर्फ ठिका संजय रायपुरे (वय 19 वर्ष)  या जखमी हरीषला काही युवकांनी वणी पोलिस ठाण्यात नेण्यात आले .

पोलिसांनी त्याला ताबडतोब उपचारसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातच त्याला विशेष उपचारार्थ चंद्रपूर येथे पाठण्यात आले असून वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील संशयितांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून,पोलिसांनी तक्रारीवरून चारही संशयीतांवर भादवि कलम 324, 34 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व त्यांचा शोध  वणी पोलीस करत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!