Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखेर….लेखी आश्वासनानंतर  ‘रास्ता रोको आंदोलन’ रद्द…

•सर्व अटी व मागण्या मान्य , गावातील युवकांमध्ये आनंददायी वातावरण

•सरपंच,उपसरपंच,सत्ताधारी ग्रा. पं. सदस्य व गावातील नेते मंडळीचा पुढाकाराने मोठा लढा यशस्वी….

वणी( 5 मे ) :- राजूर कॉ येथील कोल वाशरी व रेल्वे सायडीग विरोधात गुरुवार दिनांक ५-५-२०२२ रोजी पुकारलेल्या ” रास्ता रोको” आंदोलन गावातील कर्तव्यदक्ष सरपंच विद्या डेव्हीड पेरकावार ,सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नेते मंडळी यांचा नेतृत्त्वात असंख्य नागरिक व युवकांच्या उपस्थीतीत हा “रास्ता रोको आंदोलन” यशस्विरीत्या अटीसहित त्यांचा मागण्या मान्य करीत लेखी आश्वानानंतर रद्द करण्यात आला.

तालुक्यातील राजूर नजीकच्या दोन कोल वॉशरीज व रेल्वे सायडीग कालांतराने सुरु झाल्या असल्या तरी स्थानिक युवकांच्या पदरी निराशा व या युवकांचा नशिबी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होते. कोलवॉशरी मुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करणाऱ्या युवक रोजगाराची आस ठेऊन असलेल्या येथील युवकांना या कोल वॉशरीज मध्ये रोजगार न मिळाल्याने त्यांचा निराशा पदरी पडल्या होत्या.तसेच कोल वॉशरीजमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर न करता सर्व नियम धाब्यावर ठेवत समस्यात भर देत आहे. या वाढत असलेल्या समस्यांकडे व स्थानिक युवकांना रोजगारसंदर्भात ग्रामपचायत राजूर तर्फे वारंवार निवेदने देऊनही प्रशासन कान डोळा करीत होते .

त्याकरिता राजूर येथील कोल वाशरीमुळे गावात निर्माण झालेले प्रदूषण व स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी गावातील सरपंच, ग्रा. पंचायत सदस्य, नेते व नागरिक युवकांचाच्या वतीने दिनांक ५-५-२०२२ रोजी रिंग रोड वर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात संजीवरेड्डी बोदकुरवार( आमदार वणी विधान सभा क्षेत्र) यांनी भेट दिली. तसेच राजूर कॉ. येथील प्रतिष्ठीत अशोक वानखेडे, डेनी संड्रावार, समाजसेवक डेव्हिड पेराकावार, अनिल डवरे, ॲड. अरविंद सिडाम, प्रकाश बलकी, अश्विनी बलकी, (उप सरपंच राजूर,) ,दिपाली सातपुते ग्रा. पं. सदस्य, वंदना देवतळे, ग्रा. पं. सदस्य, मंजुषा अरविंद सिडाम, ग्रा. पं. सदस्य, पायल अनिल डवरे, ग्रा. पं. सदस्य, विजय प्रजापती उर्फ बल्ली, ग्रा. पं. सदस्य, चेतना पाटील, ग्रा. पं. सदस्य, विवेक निमसटकर ग्रा. पं. सदस्य यांच्यामार्फत शिष्टमडळासह कोल वाशरी व रेल्वे सायडीग अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली.

या चर्चेत कोल वाशरी अधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद असलेल्या मागण्या मान्य केल्यामुळे हे रास्ता रोको आंदोलन यशस्वी रित्या मागे घेण्यात आले.

सदर रास्ता रोको आंदोलनात गावातील २०० ते २५० युवक आणि जनता सहभागी झाली होती.निवेदनात नमूद मागण्याचे वाचन व आभार प्रदर्शन डेव्हिड पेरकावार यांनी केले. तसेच जनतेने केलेल्या सहाकार्याबद्दल राजूर गावच्या सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार यांनी समस्त जनतेला धन्यवाद केले.

“गावातील समस्याचे निराकरण करणे हाच माझा व सत्ताधारी ग्रामपंचायचा सदस्याच्या एकमेव उद्देश आहे व गावाचा विकासाचा कामाकडे लक्ष देणे हेच माझे आद्य कर्तव्य”  –   विद्या डेव्हीड पेरकावार( सरपंच , राजूर ग्रामपंचायत)

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!