Vidarbh24News

Latest Online Breaking News

*तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्याचा वाजला डंका.* *स्पर्धेत एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त.*

*तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्याचा वाजला डंका.*

*स्पर्धेत एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त.*

पोंभुर्णा:- नुकत्याच झालेल्या तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 हि दि. 04/04/20210 वरोरा येथील बावणे मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 300-400 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उमरी पोतदार ता. पोंभुर्णा येथील मुलांनी विजयी होऊन स्वतः सोबत गावाचे नाव उंचावले. या स्पर्धेत एक गोल्ड दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त केली . याचा संपूर्ण श्रेय या मुलांना घडवणारे मास्टर मुकेश तांडेकर यांना जातो. मुलांना योग्य मार्ग दाखवून आज नॅशनल चॅम्पियन बनवले योग्य दिशा दाखवणारे असेल तर यशस्वी मार्गाने वाटचाल होते आणि मिळते ते म्हणजे “यश”.

या स्पर्धेत सहभागी झालेले उमरी पोतदार (ता. पोंभुर्णा) येथील कोमल पेंदोर,अंकुश उराडे, स्वप्नील ठाकरे, महेश कुळमेथे, अमित कुंभरे, वैभव ठाकरे, आशिष साउलकर, अजिंक्य कुंभरे, अनिल सतार यांनी सहभाग होऊन मुलांनी केलेल्या श्रमाचे फळ त्यांनी विजय संपादन करून मिळवले.

तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजक मास्टर प्रवीण रामटेके यांनी कोरोना सारख्या विषाणूचा संक्रमण होऊ नये म्हणून खूप चांगल्या प्रकारे उपाययोजना केल्या होत्या व आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित करून ही स्पर्धा यशस्वी रीत्या पार पाडली.

या स्पर्धेमध्ये बाहेरून आलेल्या टीम ने सुद्धा आपले कला दाखवली, शेवटी स्पर्धा आहे कोणी जिंकतो तर कोणी हरतो. मेहनत करेल, जो करत राहणार मेहनत त्याला शेवटी यश मिळतोच हेच उमरी पोतदार च्या मुलांनी आज या स्पर्धेमध्ये विजयी होऊन दाखवून दिले आहे.

(बाक्स)

तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्याच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, उपसरपंच मंगेश उपरे, मनोज मुलक्लवार, जयंत पिंपळशेंडे, चंद्रशेखर झगडकर, लक्ष्मण गव्हारे, भैरव दिवसे, स्वप्निल पिंपळशेंडे, राहुल वासेकर उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!