Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर येथील रविवारच्या आठवडी बाजार बंद …

★व्यापारी ,भाजीविक्रेते व नागरिकांनी नोंद घ्यावी – सरपंच विद्या डेव्हीड पेरकावार

★कोणत्याही व्यापाऱ्यांनी रविवारी गावात कुठेही बाजार लावू नये तसेच भाजीपाला विक्रेते यांनीही कुठेही भाजीपाला विक्रीस बसू नये अन्यथा कारवाई होणार …

वणी (10 .एप्रिल ):– तालुक्यातील सर्वात मोठ्या राजूर गावातील परिसरातील आठवडी बाजार बंद ठेवण्यास व्यापारी,भाजीपाला विक्रेते तसेच नागरिकांना राजुर ग्रामपंचायत मार्फत आवाहन करण्यात येत आहे.कोरोनाच्या(कोव्हीड-19) पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी यांचे पुढील आदेश येईपर्यंत राजूर येथील प्रत्येक रविवार रोजी घेण्यात येणारा आठवडी बाजार बंद राहणार आहे .

याची सर्व व्यापारी ,भाजी विक्रेते ग्राहक व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार यांनी केले आहे.कोरोनाच्या महामारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापार बंद करण्यात आले असून गर्दी होऊ नये, यासाठी राजूर येथील आठवडी बाजार बंद चा निर्णय घेण्यात आला आहे.रविवार रोजीचा आठवडी बाजार कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.कोणत्याही व्यापाऱ्यांनी रविवारी गावात कुठेही बाजार लावू नये तसेच भाजीपाला विक्रेते यांनी ही कुठेही भाजीपाला विक्रीस बसू नये.असे आढळून आल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार राहील अशी माहिती विदर्भ 24न्यूजच्या प्रतिनिधिला राजुर येथील ग्रामसेवकांनी व सरपंच यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ही खबरदारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घेण्यात आली असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना गावात करण्यात आलेल्या आहे.आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत उपस्थित म्हणून सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार,उपसरपंच बलकी ,सचिव, पोलीस पाटील व तलाठी आदि उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!